देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, राज्यात पुढील पाच दिवस किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. २० जिल्ह्यांमधल्या साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मराठवाड्यातल्या बहुतांश भागात गेल्या ४८ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव ग्रामीण आणि पारगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.