डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला, तर महाराष्ट्रात तापमानात वाढ

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे तर महाराष्ट्रात तापमानानं उच्चांक गाठला आहे.
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काल संध्याकाळपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत असून हवामान खात्यानं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढच्या काही दिवसात अनेक भागात अधूनमधून पाऊस आणि हिमवृष्टी होईल. सोमवार पासून खोऱ्यातलं हवामान स्थिर होणार असून येत्या २४ मार्च पर्यंत परिसरातलं हवामान कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्रीनगर मध्ये देखील आज हिमवृष्टी होणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर उद्यापासून हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज आहे.

 

राजस्थान राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वीज कोसळण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कालपासून गारपीट होत असून आज देखील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल आणि नऊ जिल्ह्यांमध्ये वादळ सदृश्य परिस्थिती असेल, असा अंदाज आहे.
पश्चिम बंगाल मध्ये येत्या १८ मार्च पर्यंत उष्णतेची लाट असेल तर दक्षिण आणि पश्चिम भागातल्या काही जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील, असा अंदाज आहे.

 

महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा ३९ ते ४० अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा