प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. काल महाकुंभ मेळ्याच्या पूर्वावलोकन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. महाकुंभ म्हणजे संस्कृती, कला आणि हस्तकलेच्या जागतिक देवाणघेवाणीची संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मेळ्यात उत्तम निवास आणि वाहतूक व्यवस्था देण्यासाठी सरकार बांधील असल्याचंही ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना महाकुंभ साठी आमंत्रित करण्याचं आवाहन उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी केलं. यावेळी बऱ्याच देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त उपस्थित होते.
Site Admin | November 30, 2024 11:42 AM | Gajendra Singh Shekhawat