डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये लोकसभा सचिवालयाने संसद सदस्यांना केली विनंती

सर्व खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करु नये अशी विनंती लोकसभा सचिवालयानं सर्व संसद सदस्यांना केली आहे. अशा आंदोलनांमुळे अधिवेशनादरम्यान संसद सदस्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. संसद भवनातील सदस्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इमारतीचे प्रवेशद्वार जाण्या-येण्यासाठी मोकळं ठेवणं आवश्यक आहे. या संदर्भात लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचं सदस्यांनी पालन करावं असंही सचिवालयानं सुचवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा