गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी अकोला जिल्ह्यातल्या २७ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत ५४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या मदतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं काम १४ ऑगस्टपासून महसूल प्रशासनानं सुरू केलं आहे. या याद्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.
Site Admin | August 20, 2024 3:46 PM | Akola
अकोला जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं सुरू
