खोखो विश्वचषक स्पर्धेची सुरुवात येत्या सोमवार पासून नवी दिल्ली इथल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीअम मध्ये होणार आहे. २० पुरुष आणि १९ महिला संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत १४ संघांचं आगमन झाल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. युरोप, दिक्षिण अफ्रिका, दक्षिण अमेरिकेमधले संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेची पूर्ण तयारी झाल्याचंही आयोजकांनी सांगितलं. १९ जानेवारी पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.