खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्किइंगसारख्या स्पर्धा होणार आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी या काळात अल्पाइन स्किइंग, स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.