डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नदीजोड प्रकल्प वेगाने हाती घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

कोकणातलं वाया जाणारं पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणं या महत्वाच्या विषयांसह दुध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना  न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. नदीजोड  प्रकल्पाला वेग द्यायच्या सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं ते यावेळी म्हणाले. 

कांद्याच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची विनंती प्रधानमंत्र्यांना केली. सोयाबीन आणि कापसाचा हमी भाव वाढवून मिळावा. हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री  न्याय देऊ शकतात त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा