कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानतळ, सीमामार्ग आणि व्यापारी मार्ग खुले केल्याचं दुतावासानं म्हटलं आहे. भारतीय दुतावासाने कांगोतल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दुतावासाने भारतीय नागरिकांना सर्व आवश्यक ओळखपत्रे आणि प्रवास दस्तावेज बरोबर बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसंच औषधे, कपडे, प्रवास दस्तावेज, खाद्यपदार्थ आणि पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूदेखील बरोबर ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.