देशभरात आजपासून लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. या तीन कायद्यांबद्दल पोलीस विभाग नवी मुंबईत जनजागृती करत आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित पोलीसांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळांनी सुसज्ज असलेल्या दोन गाड्याही सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचं भारंबे या पत्रकार परिषदेत म्हणाले.
Site Admin | July 1, 2024 6:51 PM | नवी मुंबई | मिलिंद भारंबे
देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु
