जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधीची आढावा बैठक काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथ झाली. या बैठकीला गृहसचिव गोविंद मोहन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा संस्थांना दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्याचं आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी, समन्वित पद्धतीनं काम करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये त्यांनी क्षेत्र वर्चस्व योजना आणि शून्य दहशतवाद योजना राबविण्यावर भर दिला होता. दहशतवादी घटना, घुसखोरी आणि दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती, यामध्ये लक्षणीय घट झाल्याबद्दल सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचं शहा यांनी त्या बैठकीत कौतुक केलं होतं.
Site Admin | February 5, 2025 11:16 AM | Home Minister | security agencies
सुरक्षा संस्थांच्या प्रयत्नांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक
