डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 11, 2024 8:35 PM

printer

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपाची विरोधकांवर जोरदार टीका

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपानं आज विरोधकांवर जोरदार टीका केली.  गेल्या काही वर्षांपासून संसदेचे अधिवेशन सुरू होते तेव्हा परदेशी संस्थेचा अहवाल प्रसिद्ध होतो असं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खासगी कंपनी या संभ्रमातून विरोधकांनी देशात आर्थिक अराजकता निर्माण केल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला.

 

दरम्यान, सेबी प्रमुखांविरुद्ध अमेरिकेतल्या शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग अहवालात केलेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये केली.  मध्यमवर्गातले लहान आणि मध्यम गुंतवणूकदार कष्टानं कमावलेले पैसे शेअर बाजारात गुंतवतात त्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे कारण त्यांचा सेबीवर विश्वास आहे असं ते म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा