डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

समाजात शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्र बनण्याचं ध्येय गाठता येणार नाही, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. उद्या साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंतीच्या निमित्तानं आज मुंबईत आयोजित ‘सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सौहार्द’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयीचे पूर्वग्रह दूर व्हायला आणि समाजतील दुही मिटवायला मदत होईल, असंही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे देखील उपस्थित होते.
महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विश्वनवकार महामंत्र दिनानिमित्त पुणे आणि बीड शहरात सामूहिक जप आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शांततेतून सक्षम भारताची वाटचाल ही कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा