आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुरामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील 178 वन तपासणी नाकी आणि प्राण्यांनी जवळच्या टेकड्यांवर स्थलांतर केलं आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्यान प्राधिकरणाने वाहतूक वळवण्याचे आदेश दिले असून अवजड व्यावसायिक वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून बुऱ्हिडीहिंग नदी पुराच्या सर्वोच्च पातळीवरून वाहत आहे.
Site Admin | July 4, 2024 10:13 AM | आसाम | पूर
आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर
