पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच ‘वेव्हज्’ भारताला आशयनिर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उदयाला आणेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. सर्जनशीलतेचे शक्तीपीठ बनण्याच्या दृष्टीने भारतात पाया रचला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
वेव्हज् परिषदेच्या निमित्तानं जगभरातल्या माध्यम क्षेत्रातल्या अव्वल कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोरंजन विश्वातले दिग्गज, सर्जनशील विचारवंत एकाच व्यासपीठावर येतील, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वेव्हजच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. या वर्षी पहिली वेव्हज् परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे, अशी माहिती वैष्णव त्यांनी दिली.