देशातल्या समुद्र किनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा केंद्र सरकारतर्फे उद्या सुरू होणार आहे. या टप्प्यात अरबी समुद्र, अंदमान समुद्रात पसरलेल्या १३ खनिज ठोकळ्यांचा समावेश असेल. हे ठोकळे बांधकामाला उपयुक्त ठरणारी वाळू, चुन्याची माती तसंच मिश्रधातूंच्या खड्यांपासून बनलेले आहेत. या खनिजांचा वापर पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि हरित उर्जा संक्रमण या क्षेत्रांमध्ये होतो.
Site Admin | November 27, 2024 1:16 PM | Mineral mines