भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेच्या वतीनं पथुम निसंका आणि दुनिथ यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताच्या अर्शदीप आणि अक्सर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विजयासाठी २३१ धावांचा पाठलाग करताना भारतानं ७५ धावांची दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ ४८व्या षटकात २३० धावांमध्येच माघारी परतला. कर्णधार रोहीत शर्मानं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. तर श्रीलंकेच्या वानिनदू आणि चरिथ यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.