भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघादरम्यानच्या, मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज राजकोट इथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने या आधीचे दोन्ही सामने जिंकले असून, आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल.