दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर करण्यात आलं. संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेलं बोधचिन्ह एका राष्ट्रस्तरीय स्पर्धेद्वारे निवडलं आहे.
हे बोधचिन्ह लोणी काळभोर इथल्या ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी तयार केलं आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तर विजयी स्पर्धक प्रसाद गवळी यांचा साहित्य संमेलनात विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती सरहद संस्थेच्या संस्थापकांनी दिली आहे.