डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीविषयीही त्यांनी खुलासा केला, ते म्हणाले.
‘‘आपण एक लक्षात ठेवा पाच ते सहाच्या नंतर सहाला कोणी क्यू मध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते. म्हणून पूर्ण दिवसामध्ये कुठल्याही स्तरावर किती टक्केवारीने वाढले, किती नंबरला वाढले एवढेच नंबर पाचच्या नंतर सुद्धा वाढलेले आहेत. चुकून आपण झारखंडच्या सोबत काही कम्पॅरिजन होत आहे. झारखंड मध्ये पाच वाजता मतदान क्लोज झालेला आहे ऑफिशियली. महाराष्ट्र मोठा राजे असल्यामुळे सहा वाजता बंद झाले. झारखंड पूर्वीपासून अरली वोटिंग राज्य आहे. म्हणजे लवकर येऊन लोक मतदान करून जातात. सात ते नऊ मध्ये त्यांच्या परसेंटेज पाहिलं तर फार मोठा असतो आपल्याकडे सात ते नऊ मध्ये कमी असतं.’’

सर्वाधिक वाचले

सर्व पहा