विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही, याविरोधात आपण न्यायालयीन लढाई लढू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
ते आज नागपूर मध्ये वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केला आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.