सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4 दशांश टक्के राहण्याचा अंदाज
देशाचं 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या देशांतर्गत सकल उत्पादन वाढीचा दर सहा पूर्णांक ४ दशांश टक्के राहिल असा प्राथमिक अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल याबाबतची आकडेवारी प्रसिद्धी केली.
त्यानुसार देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनात 9 पूर्णांक 7 दशांश टक्के वृद्धी दिसून आली आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये ही वाढ 3 पूर्णांक 8 दशांश टक्के झाली आहे. बांधकाम क्षेत्र, वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातही सात पूर्णांक 3 टक्के वाढ अपेक्षित आहे.