कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते.
कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिएटर्सचा सन्मान कोकण सन्मान कार्यक्रमातून राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ सिने नाट्य कलाकार विद्याधर कार्लेकर, ठाकर लोककला जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अखंड समाजसेवेचा व्रत घेतलेले दयानंद कुबल यांचा विशेष सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.