महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाला दिलेला संदेश जगात सर्वदूर पोहोचावा, या उद्देशानं पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काल रवाना झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांची विधिवत पूजा करून दिंडीनं लंडनच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. मूळचे अहिल्यानगरचे आणि लंडनमध्ये स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी या दिंडीचं आयोजन केलं आहे. ब्रिटनच्या मराठी मंडळाच्या वतीनं लंडनमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही दिंडी २२ देशांमधून १८ हजार किलोमीटरचा प्रवास ७० दिवसांत करून २१ जून रोजी लंडनला पोहोचेल.
Site Admin | April 15, 2025 2:52 PM | पंढरपूर | लंडन | विठुराया दिंडी
पंढरपूर ते लंडन अशा विठुरायाच्या दिंडीचं लंडनच्या दिशेने प्रस्थान
