महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात बोलत होते.
या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर नेते उपस्थित होते. पटोले यांनीही त्यांच्या भाषणात हे आश्वासन दिलं. जुनी पेन्शन योजना काँग्रेसच्या काळात सुरु होती, ती अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बंद केली. आणि आता भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. पण काँग्रेसचं सरकार ज्या राज्यात आहे तिथं जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, असं ते म्हणाले.
राज्यात अडीच लाख सरकारी पदं रिक्त आहेत पण महायुती सरकार ती पदं भरत नाही. मविआचं सरकार आल्यानंतर ही रिक्त पदंही भरली जातील, असं पटोले यांनी सांगितलं.