डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला – उपमुख्यमंत्री अजित पवार

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकरी नाराज झाले, याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे कांदा निर्यातीवर बंदी लादण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं आयोजित लाडकी बहीण संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन महिला सक्षम व्हाव्यात हा सरकारचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. जनतेची शक्ती अनेक वर्षांपासून आपल्या पाठीशी असून जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जनसन्मान यात्रा काढल्याचंही पवार यांनी सांगितलं. तसंच राज्य सरकारने सुरू केलेल्या जनहिताच्या योजना भविष्यातही सुरू राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा