आसाममधल्या धिंग इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा आज सकाळी मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर त्याने तलावात उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. नागाव जिल्ह्यातील धिंग इथल्या या गुन्ह्यात तीन जणांचा कथित सहभाग असल्याचे वृत्त आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
Site Admin | August 24, 2024 2:32 PM | आसाम | बलात्कार
आसाममधल्या धिंग इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा मृत्यू
