अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांवर उमटले. जागतिक व्यापारासाठी ब्रिक्स राष्ट्रांना लक्ष्य करून अमेरिकन डॉलवरचं अवलंबित्व कमी करणाऱ्या देशांवर १०० टक्के कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताच्या दोन्ही शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण पाहायला मिळाली.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर १ हजार २३५ अंकांची घसरण झाली, आणि तो ७५ हजार ८३८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२० अंकांची घसरण नोंदवत २३ हजार २४ अंकांवर बंद झाला. निफ्टी आज दिवसभरात २३ हजारांखाली पोहोचला होता. या घसरणीमुळे गुतंवणूकदारांचं ७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.