एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारताच्या निर्यातीत 7 पूर्णांक 28 टक्क्यांनी वाढ झाली असून 468 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात झाली आहे, 2023 मध्ये याच कालावधीत भारताची निर्यात 436 बिलियन डॉलर्स इतकी होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्यापारी मालाची निर्यात 252 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २४४ बिलियन डॉलर्स इतकी होती.तर एप्रिल-ऑक्टोबर 2024 दरम्यान सेवा क्षेत्रातील निर्यातीचे अंदाजे मूल्य 215 बिलियन डॉलर्स इतकं नोंदवण्यात आलं असून जे मागील वर्षातील 191 बिलियन डॉलर्स इतकं होतं.
Site Admin | November 15, 2024 12:10 PM | country's exports increased