डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 1, 2024 9:48 AM | PM Narendra Modi

printer

‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू – प्रधानमंत्री

 

‘एक राष्ट्र एक नागरी संहिता’ म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर्ष सुरु होत असून, पुढचे दोन वर्ष हा जयंतीउत्सव देशभर साजरा केला जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

 

देशांत सर्वत्र लागू असलेलं आधार कार्ड, जीएसटी कर प्रणाली यांचं यश अधोरेखित करत त्यांनी, एकजुटीच्या या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ च्या दिशेने सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल आणि देशाला, ‘विकसित भारताचं’ स्वप्न साकार करण्यासाठी नवी गती मिळेल असं मोदी म्हणाले. देशाच्या अखंडतेला बाधा आणू पाहणाऱ्या फुटीरतावादी शक्तीपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं.

 

तत्पूर्वी मोदी यांनी एकतानगर इथं असलेल्या सरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुष्पांजली अर्पण करुन नागरीकांना एकतेची शपथ दिली. केवडीया इथल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाची मुख्य नेपथ्य संकल्पना दुर्गदुर्गेश्वर रायगड अशी आहे; त्या अनुषंगानं बोलताना प्रधानमंत्र्यां नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला; देशभक्तीचे संस्कार रुजवणाऱ्या रायगडाला मानाचं स्थान दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा