देशानं ९६ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या तरंगांचा नवा लिलाव कालपासून सुरु केला आहे. या लिलावात फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या ८ बँड चा समावेश असून या तरंगांच्या उत्सर्जनाचा अधिकार मिळवण्यासाठी फाईव्ह जी मोबाइलची सेवा पुरवणाऱ्या मोठ्या उद्योजक कंपन्या रस घेतील असा अंदाज आहे.
यापूर्वी ऑगस्ट २०२२ दरम्यान केलेल्या अशा प्रकारच्या लिलावाच्या माध्यमातून सरकारला दीड लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला होता.