पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा ३५९ स्नातकाना पदवी प्रदान करण्यात आली.
यामध्ये विज्ञान शाखेचे ८३, संगणक विज्ञान ८६, कला शाखेचे ५८ तर बी टेक शाखेच्या १३२ छात्रांचा समावेश असून १९ परदेशी छात्र आहेत. उद्या सकाळी १४७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन होणार असून, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मानवंदना स्वीकारतील.