देशातल्या सर्व मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्यसरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या परिषदेची सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेची संकल्पना उद्योजकता, रोजगार आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन – लोकसंख्या समीकरणाचे फायदे अशी आहे. परिषदेला काल प्रारंभ झाला असून आज समान विकास आराखड्यावर राज्यसरकारांच्या सहभागातून काम याविषयावर आज चर्चा होत आहे. सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, आणि विविध क्षेत्रातले तज्ञ परिषदेला उपस्थित आहेत.