सिंधुदुर्ग जिल्हात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी तसंच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी, तसंच नौदलाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. याखेरीज राजकोटमधेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यासाठी देशातले नामवंत शिल्पकार, अभियंते, तज्ञ आणि नौदलाचे प्रतिनिधी यांची तज्ञ समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
दरम्यान, पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज नाशिकमधे पाथर्डी फाटा इथं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं. याप्रकरणी शासनाने घेतलेल्या भूमिकेबाबत देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
Site Admin | August 29, 2024 7:14 PM | CM Eknath Shinde