दावोसमध्ये येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या पूर्वी फडणवीस त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात राज्याला पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावरआणण्यात याचं महत्वाचं योगदान होतं. या भेटीदरम्यान अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत.