डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाऊस झाल्यानं  त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेनं तयार केलेल्या साठण तलावामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पहिल्यांदाच मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा  निचरा होण्यासाठी मदत होत आहे, असंही ते म्हणाले.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा