डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कर्नाटकचे मुख्यमंत्री मुडा घोटाळ्याप्रकरणी मैसुरूमधल्या लोकायुक्त पोलिसांसमोर झाले हजर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आज मुडा घोटाळ्याप्रकरणी मैसुरूमधल्या लोकायुक्त पोलिसांसमोर हजर झाले. मैसुरू विकास प्राधिकरणानं याप्रकरणी सिद्दरामय्या, त्यांची पत्नी आणि इतरांच्या विरोधात फसवणूक, भ्रष्टाचार आदी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात मिळालेली जमीन ईडीच्या तक्रारीनंतर सिद्दरामय्या यांच्या पत्नीनं परत केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयानं लोकायुक्तांकडून सद्यस्थिती अहवाल मागवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा