डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 8, 2024 7:03 PM | CM Eknath Shinde

printer

राज्य सरकारनं जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळं त्यांची फारशी चर्चा होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

 

देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. वारकरी संप्रदाय आणि संतपरंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आणि समाज घडवण्याचा कारखाना आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा