केंद्र सरकारनं 2024-25 च्या गाळप हंगामासाठी उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरची बंदी उठवली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
Site Admin | August 30, 2024 10:04 AM | इथेनॉल उत्पादन | केंद्र सरकार