ग्राहकांना परवडणाऱ्या दरांत अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार अन्नधान्यांची उपलब्धता आणि बाजारातील किंमतीवर बारकाईनं लक्ष ठेवत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे.
यंदाच्या वर्षी तुरडाळीचं उत्पादन 35 लाख टनापेक्षा अधिक राहाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर मूगडाळीच्या उत्पादनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होईल. तर खरीप कांद्यांचे उत्पादनही अधिक होण्याची अंदाज मंत्रालयानं व्यक्त केला आहे.