भारताच्या सीमेला लागून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीनकडून महाकाय धरण बांधण्याच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचं हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करत राहील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आग्रा इथं स्पष्ट केलं.
चीनने नुकतेच ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्याची योजना जाहीर केली आहे. ब्रह्मपुत्रेच्या खालील भागातल्या राज्यांना यामुळे हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन सरकारनं चीनला केलं आहे.