नीट परीक्षेतल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ग्रेस मार्कशिवाय मिळालेले गुण या विद्यार्थ्यांना कळवले जातील आणि त्यांना २३ जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नसेल त्यांचे ग्रेस मार्कांशिवाय मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.
२३ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल, असंही सरकारनं आज सांगितलं. ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करण्यासाठी सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या शिफारसींनुसार सरकारनं हा निर्णय घेतला आहे.