महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २६ तारखेला तर झारखंडचा जानेवारीच्या ५ तारखेला संपणार आहे. २०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी ६१ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदान झालं होतं.