झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान १३ नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळं तिथं प्रचार संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज धनबाद जिल्ह्यात बागमारा विधानसभा मतदारसंघ आणि पूर्व सिंगभूम जिल्ह्यात जमशेदपूर इथं निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सभा रांची, खरसावा आणि मंदार मतदारसंघात होणार आहेत, तर राजद, एजेएसयू आणि डाव्या पक्षांचे नेते राज्याच्या विविध भागांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करतील.
झारखंडमधे दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचारही वेगाने सुरु आहे.
Site Admin | November 9, 2024 6:59 PM | झारखंड | विधानसभा निवडणुक