राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुविधा अशा विविध बाबींचा आढावा घेतला. विधानभवनात काल झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसंच गृह, सामान्य प्रशासन, महानगरपालिका, वाहतूक, आरोग्य इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.