संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.
यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला आणि अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देतील.