डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीरमध्ये आरएस पुरा इथं सीमावर्ती भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं हाणला

जम्मू काश्मीरमध्ये आरएस पुरा इथं सीमावर्ती भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं काल रात्री हाणून पाडला. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारूगोळा जप्त केला. आरएस पुरा इथल्या सीमा भागात काल रात्री दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. गस्तीवरील बीएसएफ जवानांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावला. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. आज सकाळी या भागाची तपासणी केली असता रायफल, दोन बंदुका आणि मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्याचंही प्रवक्त्यानं सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा