डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारनं कोणती योजना तयार करावी किंवा ती प्राधान्यानं राबवावी ही बाब न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं स्पष्ट करून न्यायालयानं ही याचिका फेटाळली.

 

केवळ विरोधासाठी या योजनेला दिलेलं आव्हान उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे.

 

तर, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानं विरोधकांना चपराक बसली असल्याचे शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा