नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या २५ जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात येणार आहेत. हे विमान संध्याकाळी सात वाजेपर्यंत जळगाव इथल्या विमानतळावर पोहोचेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या काल झालेल्या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला होता.
या अपघातात जखमी झालेल्या १५-१६ लोकांवर सध्या तिथेच उपचार सुरू आहे. २-३ दिवसांनी त्यांना मुंबईला हलवलं जाईल अशी माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.