डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कुवेतमधून भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार आहेत. मृतांमध्ये केरळमधले २३ नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरेल आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होईल अशी माहिती कुवेतमधल्या भारतीय वकीलातीनं दिली आहे.
दरम्यान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग काल कुवेतला पोहोचले असून मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणण्यासाठी आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी कुवेतमधल्या सरकारसोबत चर्चा केली. तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. भारतीय दुतावार सातत्याने स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, जखमींना आणि बचावलेल्या लोकांना आवश्यक सहकार्य मिळत असल्याचे सुनिश्चित करत आहे. दुतावासाने, गरज भासल्यास मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी +965-65505246 या मदतक्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. केरळ सरकारनेही मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर कामगार तळाच्या मालक असलेल्या एनबीटीसी ने प्रत्येक पीडीतांच्या कुटुंबाला ८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर संयुक्त अरब अमिराती स्थित लुलु या व्यापारी समूहाचे अध्य़क्ष उद्योगपती एमए युसुफअली यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा